मुंबईचे फुटपाथ घेणार मोकळा ‘श्वास’ !

October 1, 2015 7:45 PM0 commentsViews:

mumbai footpath01 ऑक्टोबर : फेरीवाल्यांनी कब्जा केलेले मुंबईचे फुटपाथ लवकरच मोकळा श्वास घेतील अशी आशा आता निर्माण झालीये. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी फुटपाथवरची अतिक्रमणं हटवण्याचे आदेश दिले आहेत. आणि यासाठीची प्रणालीही त्यांनी निश्चित केली आहे.

मुंबईतील प्रत्येक वॉर्डात किती अतिक्रमणं आहेत, याचा सर्व्हे केला जाणार आहे. अतिक्रमणाचे फोटोही काढले जातील, जेणेकरून कोणत्या ठिकाणी किती फौजफाटा लागणार, याचा पालिकेला अंदाज येईल. फोटो काढल्याशिवाय अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू होणार नाही. या मोहिमेमागचं कारण म्हणजे ट्रॅफिकची वाढणारी समस्या, आणि चालताना नागरिकांना होणारा त्रास. या कारवाईचा फटका हॉटेल आणि अनेक कार्यालयांना बसणार आहे, कारण अनेक हॉटेल्स आणि कंपन्यांनी आपल्या जागेभोवती अतिक्रमणं करून आपला एरिया वाढवला आहे. नागरिक मात्र या मोहिमेबद्दल सांशक आहेत. कारण, अवघ्या मुंबईच्या फुटपाथवर फेरीवाल्यांनी कब्जा केलाय. उदरनिर्वाह करण्यासाठी जागोजागो फेरीवाल्यांनी दुकानं थाटलं आहे. आजपर्यंत अनेक वेळा फुटपाथ मोकळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, पालिकेचे अधिकारी माघारी परत येताच फेरीवाल्यांनी पुन्हा दुकानं थाटलीये. त्यामुळे आता खरंच फुटपाथ मोकळा श्वास घेतो का हे पाहावं लागले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close