‘पैशाचा पाऊस फेम’ लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

October 2, 2015 8:23 AM0 commentsViews:

shirish yadav02 ऑक्टोबर : पुण्यात पैशाचा पाऊस फेम अधिकारी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. उप-मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव असं या अधिकार्‍याचं नाव आहे. यादव याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. एसआरए कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ही मोठी कारवाई केली.

यादवने एसआरए योजनेतील अपात्र लाभधारकांना पात्र करण्यासाठी आणि प्रार्थना स्थळ अनधिकृत ठरवण्यासाठी 25 लाखांची मागणी केली होती. यापूर्वी त्याने 2 लाखांचा पहिला हप्ताही स्वीकारला होता. उर्वरीत दुसरा 5 लाखांचा हप्ता स्वीकारताना यादव एसीबीच्या जाळ्यात सापडला अशी माहिती एसीबी अधिकारी शिरीष सरदेशपांडेंनी दिली. यावेळी कार्यालयाच्या झडतीही घेण्यात आली असता 3 लाखांची अतिरिक्त रोकड हस्तगत करण्यात आली. यादवांच्या दोन्ही घरांवरही ACB कडून झाडाझडती सुरू आहे. विशेष म्हणजे टीडीआर घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीही यादवला अटक करण्यात आली होती. योगेश सातव यांनी शिरीष यादव विरोधात तक्रार केली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close