‘सनातन’वर बंदी हवीच !, एमआयएम हा तर पक्ष, काँग्रेसकडून पाठराखण

October 2, 2015 8:34 AM0 commentsViews:

ashok chavan02 ऑक्टोबर : महसूल मंत्री एकनाथ ख़डसे यांनी सनातनवर बंदी घालायची असेल तर एमआयएमवरही बंदी घालावी लागेल असं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एमआयएमची बाजू घेतलीये.

एमआयएम हा राजकीय पक्ष आहे. तर सनातनवर खुनाचे आणि दहशतवादाचे आरोप आहेत म्हणून आम्ही बंदीची मागणी करतोय असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलं.

तर दुसरीकडे एकनाथ खडसे हे देशाचे गृहमंत्री नाहीयेत त्यामुळे सनातनवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह घेतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

एमआयएमला प्रोत्साहन देण्यासाठीच खडसे असं बोलतायंत असा आरोप मलिक यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close