सेवा हमी कायदा लागू, विलंब केल्यास अधिकार्‍याला 5 हजारांपर्यंत दंड

October 2, 2015 11:47 AM0 commentsViews:

Mantralaya02 ऑक्टोबर : सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावी आणि शासन गतिमान करण्यासाठी राज्यात सेवा हमी कायदा आजपासून लागू झाला आहे. जर निर्धारीत वेळ सेवा देण्यास विलंब झाला तर दोषी अधिकार्‍याला 500 ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.

सरकारदरबारी असणारे काम आता विहित वेळेत पूर्ण होऊ शकणार आहे. या विधेयकात वेगवेगळ्या 160 सेवांचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीस जर विहित वेळेत सेवा मिळाली नाही तर ती व्यक्ती त्या विरोधात दाद मागू शकेल. यात जर अधिकारी दोषी आढळला तर त्याला दंडाची तरतूद या कायद्यात आहे. दोषी अधिकार्‍याला 500 ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या विधेयकात आहे.

राज्यातील लोकांना सेवेची हमी देणारे हे विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही या विधेयकावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नव्हता. भाजपने गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत हा कायदा लागू करण्याची हमी दिली होती. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close