टॅक्सी परवाने मराठी मुलांनाच द्या – राज ठाकरे

January 21, 2010 10:54 AM0 commentsViews: 5

21 जानेवारीटॅक्सी परवान्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या दबावाखाली घुमजाव केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. टॅक्सी परवान्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी जोरदार टिका केली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय लाचार मुख्यमंत्री एकटेच कसा बदलू शकतात ? असा सवालही त्यांनी केला आहे. ज्यांना आमचं शहर माहिती नाही, भाषा संस्कृती माहिती नाही, त्यांना इथे टॅक्सी चालवू का द्यावी. टॅक्सी परवाने भूमीपुत्रांना दिले नाही तर मंुबईत टॅक्सी फिरू देणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. महाराष्ट्र म्हणजे युपी- बिहारी वाल्यांची धर्मशाळा नाही. असेच निर्णय फिरवायचे असतील तर राज्यातील एम्पलॉयमेंट एक्सेंज कार्यालयं बंद करुन टाकावी असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

close