अर्जुन तेंडूलकर क्रिकेटच्या मैदानात

January 21, 2010 12:34 PM0 commentsViews: 7

21 जानेवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरही क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. पुण्यात झालेल्या 13 वर्षाखालील केडन करंडक क्रिकेट स्पर्धेत 9 वर्षाचा अर्जुन एमआयजी क्रिकेट क्लबकडून खेळत आहे. पण आपल्या पहिल्या मॅचमध्ये तो अपयशी ठरला. पहिल्या मॅचमध्ये फक्त 1 रन करुन तो रनआऊट झाला. तर दुसर्‍या मॅच मध्ये अर्जूनला आपलं खातही उघडता आलं नाही. त्याला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. अर्जुनला चिअरअप करायला सचिन जरी येऊ शकला नसला तरी अंजली तेंडूलकरने मात्र हजेरी लावली होती.