बाबासाहेबांच्या स्मारकाचं 11 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

October 2, 2015 2:25 PM0 commentsViews:

M_Id_484311_Narendra_Modi02 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 ऑक्टोबरला मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. 11 ऑक्टोबरला मोदी इंदू मिलमध्ये प्रस्तावित डॉ.बाबासाहेब आंबेडक यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करतील. त्यानंतर ते मेट्रो दोन आणि तीनचं भूमिपूजन करतील. या कार्यक्रमानंतर मोदी मुंबईत एक जाहीर सभा घेणार आहे.

बिहार निवडणुकीच्या एक दिवस आधी या सभेचं आयोजन करण्यात आलंय. ही या सभेत विकासाच्या मुद्यावर जनतेला आवाहन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान मोदी 8 ऑक्टोबरला मुंबईच्या दौर्‍यावर येणार होते.पण, आता हा दौरा 11 ऑक्टोबरला होत आहे. पण, हा दौरा स्मारकाच्या भूमीपूजनासाठी नियोजित होता आता मोदी एक सभाही घेणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलवर होणार्‍या स्मारकाच्या भूमीपूजनासाठी नाही तर बिहारमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या प्रचारासाठी येत आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. बिहारमध्ये आचारसंहिता असल्यानं तिथं भाषण न करता इथं मुंबईत सभा घेऊन भाषण करणार आहेत असा आरोप मलिक यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close