लाचखोर उपजिल्हाधिकारी नितेश ठाकूर परदेशात पळाला?

October 2, 2015 4:07 PM0 commentsViews:

image2png02 ऑक्टोबर : रायगडचा तत्कालीन लाचखोर उपजिल्हाधिकारी नितेश ठाकूरने देशाबाहेर पलायन केल्याचं सांगण्यात येत आहे. एसीबी आणि पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ठाकूरनं थेट नेपाळमार्गे पलायन केल्याचं समजतंय.

एसीबीनं 2012 मध्ये ठाकूरच्या घरावर छापा मारला होता. त्यावेळी विलेपार्ले, कांदीवली, बोरिवली, घाटकोपर, अलिबाग, मुरुड या ठिकाणी असेलेली मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांच्या गाड्या अशी जवळपास 118 कोटीची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली होती. यानंतर काही दिवसातच त्याला जामीनही मिळाला. मात्र आता पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी ठाकूर परदेशात पळाल्याची माहिती मिळतेय.

विशेष म्हणजे 2 एप्रिल 2013 मध्येही ठाकूरनं पलायन करण्याचा प्रयत्न केला असता त्याला मुंबईच्या विमानतळावर पकडण्यात आलं होतं. मात्र यानंतरही ठाकूरला तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आलं नाही किंवा त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला नाही. तेव्हापासूनच ठाकूर बेपत्ता झाला.

दरम्यान, ठाकूर हवाईमार्गे पळाला असल्यास त्याला पकडणं सोपं जाईल, मात्र तो रस्तेमार्गे पळाल्यास त्याला शोधणं कठीण असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनं म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close