संघर्षातून जन्मली ‘शांताबाई’

October 2, 2015 8:19 PM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पुणे

02 ऑक्टोबर : यंदाच्या गणेश उत्सवात ‘शांताबाई’ या गाण्यानं अक्षरश: धुमाकूळ घातला. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं अल्पावधीतच जबरदस्त हिट ठरलंय. मात्र गाण्याची मागची कहाणी 20 वर्षांपासून सुरू आहे. तब्बल 20 वर्षांपूर्वी हे गाणं लिहिलं होतं, ऐकून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल.

कानावर पडताच ठेका धरायला लावणारी ही आपल्या बोलीभाषेतील गाणी, डिस्कोसह सगळ्या प्रकारच्या पाटर्‌यामध्ये धूम करतायत आणि हे सुपरहिट गाणी लिहिली आहेत. पुण्यातील एका अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणार्‍या संजय लोंढे या गीतकारानं आपल्या कुटुंबासह 8 बाय 10च्या या खोलीत राहतो. भाकरीत चंद्र शोधणार्‍या संजयकडे जबरदस्त शब्द प्रतिभा आहे. ‘शांताबाई’सारखी अनेक गाणी त्यांनी लिहिली आहेत, जी सध्याच्या तरुणाईला तर भुरळ घालतायतच, पण राजकारणातल्या दिग्गजांवरही संजयच्या शब्दांची मोहिनी पडलीय.

Shantabai

मागील 20 वर्षांपासून शांताबाई या गाण्यासारखाच गीतकार संजयही अडगळीत पडला होता. गाण्याला संगीताची साज चढताच रसिक मायबापांनी गाणं डोक्यावर घेतलं. मात्र संजय आणि त्याच कुटुंब अजूनही दारिद्र्याच्या गर्तेत आहेत. याआधी संजयने एक गाणं बाजारात विकलं आणि आपल्या अपंग भावाच्या उपचाराचा खर्च भागवला होता. आता मात्र त्याला आपलं कुटुंब सावरायचं आहे.

‘शांताबाई…’ हे गाणं अश्लील असल्याचा आरोप काहीजण करत असले तरी “मी माझ्या मुलीच्या करमणुकीसाठी हे गाणं रचलं होतं. शिवाय माझ्या आत्याचं नाव शांताबाई आहे. या गाण्यात अश्लीलता कशी असेल, असं सांगत संजयने काहीसा खेद व्यक्त केला आहे. संजय स्वत: कमी शिकलेला असून जिद्दीनं मुलांना शिकवतो आहे. गाणं बाजारात आणून भावाच्या उपचाराचा खर्च भागवणारा संजय, भविष्यात कधीतरी मोठी संधी मिळेल, याची वाट पाहत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close