मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात पावसाचं कमबॅक

October 2, 2015 9:37 PM0 commentsViews:

paus1-685x320

02 ऑक्टोबर : औरंगाबादमध्ये पावसानं जोरदार कमबॅक केलं आहे. गेल्या दोन आठवड्यापूर्वी औरंगाबाद आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. आठवड्याभराची विश्रांती घेऊन पावसानं पुन्हा एकदा औरंगाबाद परिसरात बरसायला सुरुवात केली आहे. रब्बीच्या तयारीसाठी हा पाऊस अत्यावश्यक असून या मूळ जिल्ह्यात रब्बीची पेरणी वाढणार असल्यच कृषी विभागनं सांगितलं. या पावसान जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा तसंच चार्‍याचा प्रश्न काही अंशी मिटला आहे. ग्रामीण भागात जलयुक्त शिवारामुळे बंधारे, विहिरी तसंच बोअरवेल याला चांगलं पाणी वाढल आहे. तर वाशिममध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस बरसतो आहे. रिसोड तालुक्यातल्या किनखेडामध्य़े वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जखमी झाले आहेत.

दरम्यान, आज पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात वरूणराजा बरसला. आज सकाळपासून पुण्यातील हडपसर, शिवाजीनगर, कोथरुड परिसरात पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून कोसळणार्‍या पावसानं पुणेकर सुखावले आहेत. तर कोल्हापूरमध्येही आज पावसानं हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर दुसरीकडे कल्याण आणि परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close