इंद्राणी मुखर्जीची प्रकृती चिंताजनक, दुपारपासून बेशुद्ध

October 2, 2015 10:38 PM0 commentsViews:

fasfsafy

02 ऑक्टोबर : शिना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची प्रकृती चिंताजनक आहे. बेशुद्ध झाल्याने इंद्राणी मुखर्जीला दुपारी दोनच्या सुमारास जेजे रुग्लायात दाखल करण्यात आलं. तिने कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या खाल्ल्याचे डीन यांनी सांगितलं आहे. आता तिने नेमक्या कोणत्या गोळ्या खाल्ला याची फोरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. तिला श्वासोच्छ्वासाला त्रास होत असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close