इंद्राणी मुखर्जीची प्रकृती ‘जैसे थे’च, पुढचे 72 तास महत्त्वाचे !

October 3, 2015 2:21 PM0 commentsViews:

indrani03 ऑक्टोबर : शीना बोरा खून प्रकरणातली आरोपी इंद्राणी मुखर्जीची प्रकृती होती तशीच आहे. गोळ्याच्या अतिसेवनामुळे तिची प्रक-ती ढासाळली. पुढील 72 तासांचा गोळ्यांचा प्रभाव कमी होईल त्यामुळे पुढील 72 तास हे महत्त्वाचे आहे.

आज इंद्राणीच्या वकिलांनी डॉक्टरांची भेट घेतली. जे.जे.रुग्णालयात आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. काल दुपारी 2 वाजता इंद्राणीला जेजेमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

इंद्राणी मुखर्जी.जे जे हॉस्पिटलमधल्या आयसीयू विभागात तिच्यावर उपचार सुरू आहे. सध्या ती अर्धवट शुद्धीत आहे. इंद्राणीचा श्वासोच्छवास अद्याप स्थिर नसून श्वास घेण्यात त्रास होतेय. ती ऐकू शकते आणि सुचनांचं पालन करत असल्याचं जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलंय.

इंद्राणीची प्रकृती नियमित होण्यास आणखी तीन दिवस लागणार आहे. तिने गोळ्यांच्या जास्त डोस घेतला. गोळ्यांमधली विषारी द्रव्ये शरीराबाहेर पडण्यास 72 तास लागतील, अशी माहितीही लहाने यांनी दिली.

काल दुपारी 2 वाजता तिला जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रात्री उशिरा सीबीआयचे पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झालंय दरम्यान, झाल्याप्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहविभागाने कालच दिले आहे.

IBN लोकमतचे सवाल

1. इंद्राणी मुखर्जीला दिल्या जाणार्‍या टॅबलेट्स कोणीच तपासत नव्हते का ?
2. इंद्राणीने गोळ्याचं अतिसेवन करेपर्यंत जेल प्रशासन काय करत होतं ?
3. इंद्राणीकडे गोळ्यांचा अतिरिक्त स्टॉक नेमका कुठून आला ?
4. इंद्राणी ही हाय प्रोफाईल केसमधील आरोपी असल्याने यामागे काही घातपाताची शक्यता आहे का ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close