ऊस प्रश्नी राजू शेट्टींचा 16 ऑक्टोबरला कोल्हापुरात मोर्चा

October 3, 2015 2:30 PM0 commentsViews:

raju shetty403 ऑक्टोबर : शेतकर्‍यांना योग्य तो ऊस दर मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. येत्या 16 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात मोर्चाही काढण्यात येणार आहे.

सरकारनं मूठभर व्यापार्‍यांसाठी ढिगभर शेतकर्‍यांचं नुकसान करू नये. सरकारनं शेतकर्‍यांचा विचार केला नाही तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागले असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय.

या अगोदरही राजू शेट्टी यांनी ऊसदरासाठी आंदोलन पुकारले होते. आता पुन्हा एकदा स्वाभिमानी संघटना रस्त्यावर उतरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close