अनामी रॉय नवे पोलीस महासंचालक

January 22, 2010 10:13 AM0 commentsViews: 6

22 जानेवारी अनामी रॉय यांची पोलीस महासंचालक म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. एस. एस. विर्क यांच्या निवृत्तीनंतर हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिकामं होतं. अखेर शुक्रवारी रॉय यांचीसेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. राज्याच्या महासंचालकांच्या पदासाठी ऍडिशनल डीजी पीटी श्रीवास्तव, मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, हौसिंगचे डीजी हसन गफूर आणि अनामी रॉय यांची नावं रेसमध्ये होती. मात्र सेवाज्येष्ठतेनुसार अनामी रॉय यांचीच निवड झाली आहे. राज्याच्या मुख्य गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्क्रूटिनीमध्ये रॉय यांची निवड झाली आहे. रॉय दुसर्‍यांदा पोलीस महासंचालक बनले आहेत. यापूर्वी हायकोर्टाने रॉय यांची नियुक्ती रद्दबातल ठरवली होती. रॉय यांची नियुक्ती ही सेवाजेष्ठता टाळून झालेली होती अस कोर्टाचं म्हणणं होतं. तसेच त्यावेळी रॉय यांच्यावर सत्ताधार्‍यांचा राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनीही रॉय यांच्या निवडीला जोरदार विरोध केला होता.

close