पुन्हा नागपूर !, गुंडाच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या

October 3, 2015 4:48 PM0 commentsViews:

nagpur_crime news03 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात चाललंय काय असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण, कुख्यात गुंड सुमित ठाकूरच्या जाचाला कंटाळून प्राध्यापक म्हस्केंनी नागपूर सोडल्याची घटना ताजी असतांना गुंडांच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

दारुच्या दुकानात कॅशियरचे काम करणार्‍या सुरेश बघेल असे मृत व्यक्तीचे नाव असून तहसिल पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्याने गुन्हा दाखल केला आहे. सुरेश बघेल हे टिमकी भागातील दारुच्या दुकानात काम करित होते. याच भागातील गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारी आणि त्याचे काही साथीदार टिमकी परिसरात दारुचा व्यवसाय करायचा असल्याच दरमहा पाच हजार रुपये खंडणी मागायचे. वंजारी याने खंडणीसाठी बघेल यांना खूप त्रास दिला. शेवटी 20 ऑगस्टला बघेल यांनी विष घेऊन आत्महत्या केली. कुख्यात गुंड बाल्या वंजारीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसंच त्याच्यावर खंडणी, चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close