कारगिल निधीप्रकरणी विनय कोरेंना हायकोर्टाची नोटीस

January 22, 2010 10:16 AM0 commentsViews: 8

22 जानेवारीकारगिल निधीचा हिशोब दिला नाही म्हणून विनय कोरे यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. माजी अपारंपारिक उर्जा मंत्री आणि जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. 10 वर्षांपूर्वी आमदार कोरेंनी त्यांच्या वारणा उद्योगसमुहाच्या माध्यमातून जवानांच्या मदतीसाठी सुमारे 88 लाखांचा निधी गोळा केला होता. पण त्याच्या हिशोबाची कागदपत्र त्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे सादर केली नाहीत. याविषयी जिल्हा सहकारी संस्था, उपनिबंधकांनी तपास करून अहवाल सादर करावा, असे आदेश मंुबई हायकोर्टाने दिले आहेत.

close