चुकीचे उत्तर लिहिली म्हणून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

October 3, 2015 7:46 PM0 commentsViews:

melghat_zp_school03 ऑक्टोबर : मेळघाटातील धारणी तालुक्यातील नांदुरी इथं जिल्हा परिषदेच्या शाळेतील तिसर्‍या वर्गातील 13 मुलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पायाभूत चाचणीत चुकीचे उत्तर लिहिले म्हणून त्यांना लाकडी काठीने बेदम मारण्यात आलं.निलेश पटोकर असं या मारहाण करणार्‍या शिक्षकाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली.

मेळघाटातील धारणी तालुक्यातील नांदुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तिसर्‍या वर्गात शिकणार्‍या 13 मुलांना निलेश पटोकर नावाच्या शिक्षकाने विध्यार्थ्यांना केस ओढून, लाकडी काठीने बेदम मारहाण, पोटाला चिमटे काढल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली. कारण केवळ या विध्यार्थ्यांना पायाभूत चाचणीमध्ये चुकीचे उत्तर लिहिले एवढेच आहे.

शिक्षकाने बेदम मारल्याच्या खुणा आजही विध्यार्थ्यांच्या पाठीवर स्पष्ट दिसत आहे. शिक्षकाने मारल्याने आई वडील रागावतील या भीतीने ही सर्व मुले शाळेतून घरी न येत बाहेर पळून गेली होती. त्यांना शोधून या सर्व विद्यार्थ्यांना धरणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पालकांनी आणि विद्यार्थ्यानी दिलेल्या तक्रारीवरून धरणी पोलिसांनी शिक्षक निलेश पटोकर विरूद्ध गुन्हा दाखल केला. परंतु शिक्षण विभागाने मात्र या शिक्षकावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई न केल्याने आदिवासी संतप्त झाले आहे,या शिक्षकला बडतर्फ करावे अशी मागणी केली जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close