आगळं वेगळं डोहाळे जेवण

October 3, 2015 8:19 PM0 commentsViews:

03 ऑक्टोबर :  आजपर्यंत आपण महिलांचे डोहाळे जेवण सोहळा ऐकला आणि पाहिला, पण आपण आज एक असा डोहाळे जेवणाचा सोहळा पाहणार आहोत. ते बघुन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जळगाव शहरातील भिकमचंद जैननगरीत दिलीप चांदसरकर कुटुंबियांनी चक्क गाईचं डोहाळे जेवण सोहळा साजरा केला. चांदरकर यांच्या गंगा नावाच्या गाईला 7 वा महिना सुरू आहे. म्हणून चांदसरकर कुटुंबियांनी गंगाला फुलांनी सजवून, साडी, खण नारळाने ओटी भरुन आणि पंचपक्वानचे नैवेद्य तिला देऊन कामधेनूचे डोहाळे पुरविण्यात आलं. या सोहळासाठी चांदसरकर कुटुंबियांनी रीतसर गावात आमंत्रण देऊन मोठ्या थाट्यात हा सोहळा साजरा केला. शहरातील लेकी सुनांसह 300 जणांनी या अनोख्या डोहाळ जेवनाचा आनंद लुटला. पारंपारिक डोहाळे जेवणाची गाणी गाऊन या महिलांनी सोहळ्याची रंगत वाढवली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close