दूध महाग होणार ?

January 22, 2010 10:19 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी कृषीमंत्री शरद पवारांचं भाववाढीचं भविष्य खरं होऊ लागलंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध उत्पादक संघांनी दुधाच्या खरेदी दरात वाढ केली. या संघांकडून म्हशीच्या दुधाला 2 रुपये तर गायीच्या दुधासाठी दूधउत्पादकांना 50 पैसै जादा देण्यात येणार आहेत. यामुळे दूधउत्पादक, शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. पण यामुळे दूधच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी दुधाच्या किरकोळ विक्रीत वाढ होणार नाही, असं महानंद दूध संधाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी म्हटलं आहे.

close