इंद्राणी मुखर्जी शुद्धीवर, प्रकृतीही स्थिर- डॉ. तात्याराव लहाने

October 4, 2015 4:39 PM0 commentsViews:

lsajdsjadhashd

04 ऑक्टोबर : शिना बोरा हत्या प्रकरणातील संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जी शुद्धीवर आली असून, इंद्राणीची प्रकृती स्थिर आहे. तरी तिला पुढील काही तास तिला डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे.

इंद्राणीच्या आज दोन वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. याबाबत स्पष्टीकरण देताना, आम्ही फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट मान्य करत असल्याचं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलं आहे. हिंदुजा हॉस्पिटलच्या अहवालात मात्र इंद्राणीच्या शरीरात ऍन्टी डिप्रेसन्ट औषधांचं प्रमाण जास्त आढळल्याचं म्हटलं होतं. तर फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार इंद्राणीच्या रक्तात कुठेही रसायन आढळलं नाही.

शीना बोरा हत्याप्रकरण जितकं गूढ बनलं होतं तेवढंच इंद्राणीला काय झालंय, हे गूढही कायम आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास इंद्राणी बेशुद्ध झाली होती, आणि तेव्हापासून ती बेशुद्धच आहे. ती डीप स्लीप म्हणजे गाढ निद्रेत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. त्यामुळे पुढचे काही तास इंद्राणी डॉक्टरांच्या निगरानीखाली असणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close