लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून विहिरीत फेकलं

October 4, 2015 7:23 PM1 commentViews:

rape dsngfsdg

04 ऑक्टोबर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील गोंद्री गावात घडली आहे. अकरावीत शिकणार्‍या मुलीचं गुरुवारी रात्री नराधमांनी अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला विहीरीत फेकून दिलं.

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी साधी तक्रारही नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळं कुटुंबियांनी अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस उलटूनही मुलीवर अंत्यसंस्कार झाले नाहीत. प्रकरण चिघळेल असं लक्षात येताच पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून दोन जण फरार आहेत.

दरम्यान, कॉजमधून येताजात काही मुलं तिची छेड काढायचे. गुरुवारी काही मुलांनी पिडीत मुलीचं अपहरण करुन तिच्या बलात्कार केला आणि गावातल्या विहीरीत फेकून दिलं असं मुलीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Harshada Lingayat

    आरोपीन बरोबर पोलिसांवर पण कारवाई झाली पाहिजे

close