सोलापुरात पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया

October 4, 2015 6:46 PM0 commentsViews:

a;sfjdasjrfay

04 ऑक्टोबर : एकीकडे अवघ्या महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची तंचाईला सामोर जात असताना सोलापुरात मात्र पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. टेंभुर्णी गावाजवळ फुटलेल्या पाईपलाईन फुटली आहे. उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. उजनी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा असल्याने जिल्ह्यातील सर्वच शहरांत मोठी पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यातच आता पाईपलाईन फुटल्याने सोलापुरकरांच्या समस्येत आणखीनच वाढ झाली आहे.

सोलापूर महापालिकेकडून फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती काम पूर्ण करण्यासाठी किमान सहा तास लागणार असल्याची माहीती मिळाली आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या सोलापूरकरांना डोळ्यांदेखत पाणी फुकट गेल्याचं पाहून दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close