जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला विरोधात पुन्हा तीव्र आंदोलन

January 22, 2010 10:23 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी रत्नागिरीतल्या जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात माडबन पंचक्रोषीत शुक्वारी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू झालं आहे. सुमारे दोन हजार ग्रामस्थांनी माडबन ग्रामपंचायत बंद करून पंचायतीच्या गेटबाहेर ठिय्या सुरु केलं आहे. जमीन मोबदल्याचे चेक वाटायला आलेल्या सरकारी अधिकार्‍यांना काहीही झालं तरी ग्रामपंचायतीत बसू देणार नसल्याचा निश्चय गावकर्‍यांनी केला आहे. मोबदला वाटपाच्या अखेरच्या टप्प्यात 2 कोटी रुपयांचे चेक शेतकर्‍यांनी नाकारायचं ठरवलं आहे. माडबनमध्ये सध्या तणावाचं वातावरण असून तिथे सुमारे 200 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

close