महागाई आणि कृषी खात्याचा संबंध नाही – शरद पवार

January 22, 2010 10:30 AM0 commentsViews: 5

22 जानेवारी कृषी खात्याचा वाढत्या महागाईशी काहीही संबंध नाही. गेल्या 40 वर्षात मी पहिल्यांदाच अशा बातम्या ऐकतोय, असं सांगत कृषीमंत्री शरद पवार यांनी महागाईबाबत हात झटकलेत. वाढलेल्या महागाईबाबत सातत्याने टीकेचं लक्ष्य झाल्याने पवार यांनी आपली भूमिका मांडली. तसेच वर्षभर पुरेल एवढा गहू, तांदूळ उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांंनी केलेल्या टीकेलाही शरद पवार यांनी यावेळी उत्तर दिलं. उत्तर प्रदेशात कच्च्या साखरेवर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. साखर आयात केली तर आपला साखर कारखाना कसा चालणार या काळजीमुळेच मायावती आपल्यावर टीका करत असल्याचं पवार यावेळी सांगितलं.

close