भावाला अद्दल घडवण्यासाठी सुरेश मोटेने मित्राचा केला खून

October 5, 2015 2:05 PM0 commentsViews:

Shiruru murder

05 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातील सविंदने खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणात सुरेश मोटे यानेच स्वत:च्या खुनाचा बनाव केल्याचं उघडकीस आला असून हा बनाव रचण्यापूर्वी त्याने स्वत:च्याच मित्राचीही हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरेश मोटेने गुन्हा कबुल केल्याचं पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितलं.

21 सप्टेंबर रोजी अभिमन्यु मोटे याने वडील सुरेश यांचा खुन झाला असून प्रेत जाळुन टाकून पुरावा नष्ट केल्याबाबतची तक्रार शिरुर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी या प्रकरणी आठ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली. पण ज्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपाखाली या आठ जणांना अटक केली शिरूर पोलिसांनी त्याला म्हणजेच सुरेश मोटेला आळंदी इथून अटक केलीय. विशेष म्हणजे या गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल एका बनियानच्या साईजवरून झाली आहे. मयताच्या बनियानची साईज आणि सुरेश मोटेच्या बनियान साईजमध्ये पोलिसांना फरक आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. आणि स्वत:ला मृत घोषीत करणार्‌या सुरेश मोटेला पोलिसांनी आळंदी इथून ताब्यात घेतलं.

त्याच्याकडे कसून चौकशी केली नंतर जमिनीच्या वादादून सतत त्रास देणार्‌या भावाला कायमची अद्दल घडवण्यासाठी सुरेश मोटेने हा सारा कट रचल्याचं पोलीस तपासात पुढे आलं. पण या भाऊबंदकीच्या भांडणात आनंदराव लक्ष्मण वाघ असं या तिसर्‌याच माणसाचा नाहक बळी गेला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close