भिवंडीत दोघांचा नरबळी ?

October 5, 2015 6:19 PM0 commentsViews:

narbali

05 ऑक्टोबर : भिवंडीमध्ये अमानिया शहा तकिया कब्रस्तानात रविवारी दोन व्यक्तींचा मृतदेह आढळला आहेत. या घटनेच्या ठिकाणी जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे टाचणी, खिळे, लिंबू, काळी बाहुली आदी वस्तू सापडल्याने, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी या दोघांचा नरबळी दिल्याचा हा प्रकार असल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीतल्या या कब्रस्तानात सकाळी मासेमारीसाठी गांडुळाच्या शोधात गेला होता. त्यावेळी त्याला एक व्यक्ती झोपलेली दिसली. त्याने जवळ जाऊन पहिलं असता त्या व्यक्तीचा खून झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे घाबरुन तेथून तो पळत असताना या मृतदेहापासून काही अंतरावर अजून एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. कब्रस्तानातून बाहेर पडताना त्याने ही घटना लोकांना सांगितल्यानंतर स्थानिकांनी भोईवाडा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.

दरम्यान, मृतदेहाच्या बाजूला मिळालेल्या ब्यागेत त्याचे नाव मिनरूल ईलाही शेख असून, तो मुंबईतल्या मानखुर्द इथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दुसर्‍या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे अघोरी कृत्य कुणी केलंय, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close