अंबरनाथजवळ भीषण अपघात, सातवीच्या 8 विद्यार्थ्यांना दुचाकीने उडवलं

October 5, 2015 4:04 PM0 commentsViews:

ËáÖÖê»Öê¸ËüÖêê¸Ëü×ÝÖ¸ü

05 ऑक्टोबर : एका स्टंटबाज बाईकस्वारानं 8 शाळकरी विद्यार्थ्यांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. या घटनेत आठही विद्यार्थी जखमी झाले असून, तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबरनाथ इथल्या कल्याण कर्जत महामार्गाला लागून मसीहा इंग्लिश स्कूल आहे. त्या शाळेत 7वीमध्ये शिकणारे विद्यार्थी या अपघातात जखमी झाले. आज सकाळी साडे सातच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी अरमान खान भरधाव बाईक चालवत त्या रस्त्यानं जात असताना त्याचं बाईकवरून नियंत्रण सुटलं आणि तो या विद्यार्थ्यांच्या अंगावर आदळला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या 8 पैकी तीन विद्याथीर्ंची प्रकृती गंभीर आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी अंबरनाथमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या रस्त्यावर 4 शाळा आहेत. मात्र इथं कधी ट्रॅफिक पोलीस नसतो, असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close