पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवर्‍यांचं ‘खिचडी बनाव’ आंदोलन!

October 5, 2015 8:40 PM2 commentsViews:

05 ऑक्टोबर : आजपर्यंत आपण नवर्‍यांच्या अत्यांचारांनी ग्रासलेल्या पत्नींची अनेक आंदोलनं पाहिली असतील पण आज औरंगाबादमध्ये एक आगळंवेगळं आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन पत्नी पीडित नवर्‍यांच होतं. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या 20 ते 25 पुरुषांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालायसमोर खिचडी बनाव आंदोलन केलं. महिलांप्रमाणे पुरुषांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरू करा अशी आंदोलकांची मागणी आहे.

Khichdi andolan11

महिलांवर अत्याचार झाले की लगेच त्यांच्या बाजून अनेक कायदे उभे राहतात. मात्र आम्हा पुरुषांचं काय? आम्ही कोणाकडे आमची तक्रार नोंदवायची. प्रशासनही आमच्या या त्रासाची दखल घेत नाही, असा सवाल या आंदोलनकर्त्यांनी विचारलां आहे. तर महिलांना ज्या पध्दतीनं तक्रार निवारण केंद्राकडे पुरूषांची तक्रार करण्याची सोय आहे. तशीच पुरूषांनाही पत्नीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र असायला हवी, अशी मागणी या आंदोलनकर्त्या पुरुषांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Meena Paes

    maza ya andolankartyana purna pathinba aahe. jasya striya atyacharachya balli hotata tasech purush hi atyacharache bali hotat. pan itakach ki stri kinva purush yani suDabudhdine ase aaropa karu nayet. Nyaya denyasathi saty padatallun pahayala have.

  • ज्ञानेश्वर

    आज अनेक पुरुष जेल मध्ये जाण्याच्या भीतीने आत्महत्या करताहेत कारण खरे खरे गुन्हा केलाः असेल तर जेल मध्ये जाने काहीही वाटत नाही परंतु कुठलाही गुन्हा नसताना जेल मध्ये जाने हे फार त्रास दाई असते .आज अनेक महिला कायद्याचा तलवारी प्रमाणे पुरुषांवर वापर करताहेत .महिलांच्या खोट्या आरोपांमुळे एकतर अशा क्रूर महिलांची हत्त्या केली जातेय नाहीतर अशा महिलांच्या अत्त्याचाराला कंटाळून पुरुष आत्महत्या करताहेत , महिला कशा खोट्या तक्रारी करतात पुरावे हवे असल्यास पुरावे देखील मिळतील .

close