सरकारी दुर्लक्षामुळे 40 ‘वीजबळी’?

October 5, 2015 9:25 PM0 commentsViews:

05 ऑक्टोबर : वीज पडून राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये 40 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. वर्षभरापूर्वी हवामान खात्यानं मोठा गाजावाजा करत वीज पडण्याआधी पूर्व सूचना देणारी ‘लाईटनिंग डिटेक्टर’ ही यंत्रणा राज्यात सर्व जिल्ह्यांत बसवली होती. मात्र कुठेही ही यंत्रणा अजुनही सुरूच झालेली नाही. पन्नास किलोमीटरच्या ज्या क्षेत्रात वीज पडणार असेल त्या भागात त्याची आधीच माहिती या यंत्रणेच्या माध्यमातून मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. ही यंत्रणा बसवण्यासाठी 10 लाखापर्यंत खर्च आला आहे. वेळीच ही यंत्रणा बसवण्यात आली असती तर या सर्वांचा जीव वाचला असता.

dalshdhauish

दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्यावर पुन्हा नवीन संकट ओढवलय ते परतीच्या पावसाचे आणि कडाडणार्‍या वीजांचं. परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील उज्वला आणि रंजना साबळे या चुलत बहिणीचा शुक्रवारी शेतात कापूस वेचत असताना वीज पडून मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेल्या दोन जणी जखमी झाल्या. दोन कर्त्या बहिणींचा मृत्यू झाल्यानं साबळे कुटूंबावर आभाळ कोसळलं. गेल्या तीन दिवसांमध्ये मराठवाड्यात वीज पडून मराठवाड्यात 30 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.

यंदा दुष्काळामुळे मराठवाड्यात 65 टक्के पेरण्या झाल्याच नाहीत, ज्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मुग, बाजरी ही पीकं घेतली त्यांचं उरलं सुरलं पीकही या परतीतच्या पावसाच्या तडाख्यानं हातातून गेलंय.परभणीच्या पाथरी येथील रफिक पठाण यांच्या पाच एकर शेतात 2 पोते मुग झाले आहे त्यामुळे त्यांचा काढणीचा खर्चही निघाला नाही. अशा स्थितीत करायचं तरी काय असा प्रश्न त्यांना पडलाय. मराठवाड्यात पाऊस नसल्यानं शेतकर्‍यांचं खरीपाचं पीक हातातून गेलं, पावसाच्या तडाख्यानं रब्बीहीचं पीकही जाण्याची वेळ आलीय. तर वीज पडून जे मृत्यू झाले ते नुकसान तर कधीच भरून येणार नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close