सेंट्रल रेल्वेतील मोटरमनच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

January 22, 2010 11:56 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी सेंट्रल रेल्वेच्या मोटरमननी शुक्रवारी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मोटरमननी दुपारी चारच्या सुमारास अचानक बंद पुकारला. ओव्हर टाईम करायलाही मोटरमननी नकार दिल्यामुळे सेंट्रल रेल्वेची लोकलसेवा खोळंबली होती. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक उशिराने होत होती. मोटरमन संघटनेशी रेल्वे प्रशासनाने चर्चा केल्यानंतर मोटरमन कामावर परतले. पण सेंट्रल रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने होत होती.

close