‘झेंडा’ रिलीजनंतर गोंधळले मनसे कार्यकर्ते

January 22, 2010 1:08 PM0 commentsViews: 16

22 जानेवारी ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'झेंडा'चा शो बंद पाडला. तर बेळगावात मनसेच्या कार्यकर्त्यांनी झेडा सिनेमा पाहून फटाक्यांची अतिषबाजी केली. ठाण्यातल्या वंदना थिएटरमध्ये सुरु असलेला शो कार्यकर्त्यांनी बंद पाडला. विशेष म्हणजे मनसेकडून आधी झेंडाला हिरवा कंदील मिळाला होता. मात्र बेळगावात राज ठाकरे समर्थकांनीच झेंडाचं जोरदार स्वागत केलं. बेळगावात अवधूत गुप्तेच्या झेंडा सिनेमाच्या पहिल्या शोच्या वेळी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरदार फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. ठाण्यात झेंडाचा शो पाहून चिडलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी झेंडाचा शो बंद पाडला. ठाण्यात बंद पडालेल्या कार्यकर्त्यांशी मनसेचा संबंध नसल्याची प्रतिक्रीया मनसेचे सिने वर्कर्स असोशिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे. सामान्य मराठी माणसाला जर सिनेमा पाहून राग आला असेल तर त्यांनी हा सिनेमा बंद पाडला असेल असं खोपकर यांचं म्हणणं आहे.

close