‘फोक्सवॅगन’चा युरोपातही 80 लाख गाड्यांमध्ये ‘झोल’ ?

October 6, 2015 8:42 AM0 commentsViews:

 

volkswagen406 ऑक्टोबर : फोक्सवॅगन या बलाढ्य कार समुहाचं अमेरिकेतलं प्रकरण ताजं असताना, आता तेच पाप कंपनीनं युरोपातही केलं आहे, अशी शक्यता आहे. युरोपमध्ये तब्बल 80 लाख गाड्यांमध्ये प्रदूषण चाचण्यांचं सॉफ्टवेअर लावल्याचा दावा एका जर्मन दैनिकाने केलाय.

प्रदूषण चाचण्यांमध्ये चलाखी करणारं सॉफ्टवेअर युरोपातल्या गाड्यांमध्येही लावल्याचं फोक्सवॅगननं जर्मनीच्या संसदेला कळवल्याचा दावा एका जर्मन वृत्तपत्रानं केलाय. आणि या गाड्यांची संख्या थोडीथोडकी नाहीये. तर तब्बल 80 लाख गाड्यांमध्ये फोक्सवॅगननं हे सॉफ्टवेअर बसवल्याचं वृत्त आहे.

पण, यावर कंपनीकडून अजून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण तसं असेल, तर फोक्सवॅगनसाठी हा दुसरा मोठा फटका असू शकतो, कारण मग अनेक युरोपिअन देशही कंपनीला मोठे दंड ठोठावतील.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close