समीर गायकवाडच्या ‘ब्रेन मॅपिंग’वर आज सुनावणी

October 6, 2015 9:35 AM0 commentsViews:

sameer_gaikwad_pansarecase_arrest06 ऑक्टोबर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीसंबंधी आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी होणार आहे. समीर गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

तपासकार्यात समीर सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी हा अर्ज केलाय. समीर आज स्वत: हजर राहण्याची शक्यता आहे. यावेळी त्याला ब्रेन मॅपिंग चाचणीला तुझी संमती आहे का अशी विचारणा कोर्टात केली जाईल. त्याने जर नकार दर्शविल्यास हा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो कोणता निर्णय घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, समीरला 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close