वाराणसीत तणावपूर्ण शांतता, शाळा-कॉलेज बंद

October 6, 2015 12:04 PM0 commentsViews:

varanasi_viloat06 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेला वाराणसीच कालपासून अशांत आहे. पोलिसांविरोधातल्या साधूंच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं शहरात कालपासून जाळपोळीच्या घटना घडत आहेत. आंदोलनकर्त्या साधूंना थोपवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मग सांधूनी ही जाळपोळ सुरू केलीय.आज शहरात तणावपूर्ण शांतता असून खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे.

मागील महिन्यात 22 तारखेला गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात साधू मंडळींना काल प्रतिकार यात्रा काढली होती. यात हजारो लोक सहभागी झाले होते. प्रतिकार यात्रेदरम्यान काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक करत पोलिसांची गाडी आणि काही बाईक्स जाळल्या. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनीही लाठीमार केला आणि अश्रूधुरांच्या नळकांड्याही
फोडल्या. यात साधुसतांसह अर्धा डझन पोलीस कर्मचारीही जखमी झालेत. यानंतर वाराणसीमध्ये परिस्थिती नियंत्रणाखाली असली तर तणावपूर्ण शांतता आहे. शहरात जमावबंदी लागू करण्यात आलीय. खबरदारी म्हणून आज शाळा-कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येतंय. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close