असाही चोर, आधी देवाला नमन मग चोरीला प्रारंभ !

October 6, 2015 12:45 PM1 commentViews:

06 ऑक्टोबर : कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी देवाला नमस्कार करणं ही देवभक्तांची सवय असते…पण असाच एक ‘देवभक्त’ चोर सीसीटीव्हीत कैद झाला. या चोराने चोरी करण्याच्या आधीही देवाला नमस्कार केला आणि मगच चोरीच्या कामाला सुरुवात केली. नागपूरमधली ही घटना आहे.

nagpur thif4नागपूरच्या खादी ग्रामोद्योगच्या कपड्याच्या शोरूममध्ये चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरांच्या टोळीने या शोरुममधील 45 हजार रूपये लुटून नेले. या प्रकरणामध्ये 9 जणांची टोळी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. चोरांनी ही चोरी करणाच्या आधी याच शोरुममधील देवाच्या प्रतिमेला हात जोडले आणि चोरी केली हेही या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. कदाचित चोरीचं काम सुरळीत व्हावं आणि पकडलं जाऊ नये यासाठी ही प्रार्थना असू शकते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vishal

    tari pakdle gele

close