नक्षलवाद्यांना भेटण्याची धोटेंची इच्छा अपूर्ण

January 22, 2010 1:14 PM0 commentsViews: 3

22 जानेवारी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर जांबूवंतराव धोटेंनी नक्षलवाद्यांची भेट घेणार होते. मात्र जेल प्रशासनाने धोटेंना परवानगी नाकारल्याने नक्षलवाद्यांची भेट घेता आली नाही. नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जाऊन धोटें नक्षलवाद्यांची भेट घेणार होते. स्वतंत्र विदर्भासाठी गरज पडल्यास नक्षलवाद्यांची मदत घेण्याची तयारी असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच धोटेंनी केलं होतं. गुरुवारपासून जेलमधल्या नक्षलवाद्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी उपोषणला सुरुवात केली आहे. त्यांना भेटण्यासाठीच धोटे नागपूरच्या सेंट्रल जेल मध्ये गेले होते.

close