जेल ते जेजे..; इंद्राणीच्या बेशुद्धीचं गूढ कायम

October 6, 2015 2:08 PM0 commentsViews:

06 सप्टेंबर : गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असणारं हाय प्रोफाईल शीना बोरा प्रकरणान आता नवं वळण मिळालंय. या हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी दुपारी बेशुद्ध अवस्थेत जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून इंद्राणी मुखर्जीवर उपचार सुरू आहेत. मात्र, न्यायालयीन कोठडीत असताना सुद्धा इंद्राणी बाबत नेमकं झालंय तरी काय याचं कोडं अद्यापही सुटलेलं नाहीय.

indraniशीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला शुक्रवारी दुपारी बेशुद्ध अवस्थेत जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. आपल्या मुलीच्या हत्येच्या आरोपावरून इंद्राणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. भायखळा येथील जेलमध्ये असताना इंद्राणी बेशुद्धावस्थेत आढळली होती. यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन तिच्यावर उपचाराला सुरुवात करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू आहे. इंद्राणीची प्रकृती आता हळूहळू सुधारतेय. मात्र, जेलमध्ये असताना इंद्राणी मुखर्जीला नेमकं झालं तरी काय , हा प्रश्न अद्यापदी अनुत्तरीतच आहे. तणाव कमी करण्यासाठी दिल्या गेलेल्या औषधांचा ओव्हरडोस झाल्यामुळं इंद्राणीची ही अवस्था झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती.त्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये वेगळीचं माहिती समोर आलीय. यामुळे इंद्राणी प्रकऱणाबाबत गूढ निर्माण झालंय.

आयबीएन लोकमतचे सवाल

- तणाव कमी करण्यासाठी देण्यात आलेल्या औषधांचा ओव्हरडोस झाला असेल तर इंद्राणीकडे एवढ्या प्रमाणावर गोळ्या आल्या कुठुन ?
- हिंदुजा हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार औषधांच्या ओव्हरडोसमुळे हा प्रकार घडलाय मात्र, एफएसएलच्या अहवालानुसार कोणत्याही औषधांचं प्रमाण इंद्राणीच्या शरीरात सापडलं नाही ?
- हिंदुजा आणि एफएसएलच्या रिपोर्टमध्ये टोकाची विसंगती का ?
- एफएसएलचा अहवाल योग्य असेल तर गेल्या 3 दिवसांपासून जे जे रुग्णालयानं इंद्राणीवर चुकीची ट्रिटमेंट केली का ?
- जेजे हॉस्पिटलने इंद्राणीवर गोळ्या अतिसेवनावर उपचार केले आणि इंद्राणी शुद्धीत आली मग एफ एस एल रिपोर्ट चुकीचा आहे का ?
- एवढ्या मोठ्या प्रकरणातील आरोपी असाताना सुद्धा जेल प्रशासनाकडून इंद्राणीबाबबत अक्षम्य हलगर्जी झाली आहे का ?

हिंदुजा हॉस्पिटलचा अहवाल आणि एफएसएलाच्या अहवालात टोकाची विसंगती आहे. त्यामुळे यापैकी कोणत्या अहवालावर विश्वास ठेवायचा हाच प्रश्न आहे. मात्र, जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांच्या माहितीनुसार एफएसएलचा रिपोर्टच अंतिम मानला जाणार आहे. या रिपोर्टनुसार इंद्राणीला गोळ्यांचा ओव्हरडोस झालाच नाही हे जरी स्पष्ट होत असेल तर मग इंद्राणीला नेमक काय झालंय याचं उत्तर कोणाकडेच नाहीये.

जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांनी एफएसलचा रिपोर्ट अंतिम मानला जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. एफएसलच्या रिपोर्टनुसार इंद्राणीला कोणत्याही औषधाचा ओव्हरडोस झालाच नाही असं स्पष्ट होतंय. मात्र, जर हे खरं असेल तर मग इंद्राणीला नेमकं काय झालंय याबाबतची माहिती जे.जे च्या डॉक्टरांकडे आहे काय ?, असल्यास त्यांनी ती अजूनपर्यंत जाहीर का केली नाही.

सुरूवातीपासूनच कायम चर्चेत असणार्‍या शीना बोरा हत्येचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. सुरूवातीला या हत्येचा तपास तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. मात्र हा तपास अंतीम टप्प्यात असताना राकेश मारिया यांना अचानकपणे मुंबई पोलीस कमिशनर पदावरून हटवण्यात आलं. या प्रकरणात प्रमाणापेक्षा जास्त लक्ष घातल्यानेच त्यांना
वेळे अगोदरच आयुक्तपदावरून दूर करण्यात आल्याची जोरदार चर्चाही झाली. यानंतर हा तपास सीबीआयक़डे सोपावण्यात आला. त्यातच इंद्राणीच्या सध्याच्या अवस्थेनंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा नाट्यमय वळण लागलंय.

आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेली इंद्राणी हिला नेमक झालंय काय हे स्पष्ट होत नाही. ती शुद्धीवर आल्यावरचं खरं काय ते स्पष्ट होईल. तीन स्वत: गोळ्या घेतल्यात खई तिला कुणी गोळ्या जबरदस्तीने दिल्यात. आपल्या मुलीची हत्या करुन इंद्राणी बिनधास्तपणे समाजात वावरत होती. यामुळे ती गोळ्या अतिप्रमाणात घेईल का ?, हा मुद्दा देखिल चर्चीला जात आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे इंद्राणी बाबतच्या बातम्या क्षणाक्षणाला प्रसिद्ध होत होत्या. मात्र , ती आजारी आहे हे कुणाला कसं कळालं नाही. हा देखिल एक महत्वाचा मुद्दा आहेच.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close