कागल टोलचा झोल ?

October 6, 2015 3:06 PM0 commentsViews:

06 सप्टेंबर :  टोल विरोधात काम करणार्‍या माहिती अधिकारी कार्यकर्ते यांनी कोल्हापूर कागल टोलचा झोल उघड केलाय. संजय शिरोडकर आणि विवेक वेलणकर यांनी कोल्हापूर-कागल रस्त्यासंदर्भात धक्कादायक खुलासा केलाय. कोल्हापूर-कागल रस्त्यासंदर्भात एमएसआरडीसी, टोल मॉनिटरिंग युनिट आणि नॅशनल हायवे ऑथोरिटी या तिन्ही संस्थानी आतापर्यंत या रस्त्यावर वसूल झालेल्या टोलची वेगवेगळी आकडेवारी वेबसाईटवर अधिकृतरित्या घोषित केली आहे. त्यामुळे नेमके किती पैसे वसूल झालेत याबाबतही संभ्रम निर्माण झालाय. कोल्हापूर कागल रस्त्यावर 10 वर्षात किती टोल जमा झाला, त्याचे 3 वेगवेगळे आकडे समोर आले. टोल मॉनिटरिंग युनिटनुसार 687 कोटी जमा झाले. MSRDC म्हणतं 710 कोटी आले, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणतं 885 कोटी रुपये जमा झाले. म्हणजे टोल एक,काळ एकच. पण रक्कमा तीन..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close