रेणुका आत्मदहन प्रकरण : पालिकेचे दोन अधिकारी निलंबीत

January 22, 2010 1:16 PM0 commentsViews: 1

22 जानेवारी रेणुका महाडिक आत्मदहन प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या 2 अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण 7 अधिकार्‍यांवर कारवाई होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये के पूर्व विभागाचे ऑफिस सुप्रिटेंडंट आणि हेडक्लार्कचा समावेश आहे. 18 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेसमोर रेणुकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. 21 जानेवारीला तिचा जे. जे. हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. रवींद्र महाडिक हे रेणुकाचे पती महानगरपालिकेच्या के-पूर्व विभागात मोटर लोडर म्हणून कामाला होते. दीड वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं होतं. अनुकंपा तत्वावर नोकरीच्या मागणीसाठी रेणुका महानगरपालिकेत फेर्‍या मारत होती. मात्र त्यावर अधिकार्‍यांच्या उडवाउडवीच्या उत्तराला कंटाळून तिने आत्महत्या केली.

close