किरकोळ कारणावरून वृद्धास बेदम मारहाण

October 6, 2015 6:39 PM0 commentsViews:

ÁÖôûÖêׯÖÖÖêÆü¯Öy

06 सप्टेंबर : मंदिराच्या पायरीवर चप्पल काढल्याच्या कारणावरुन चौघा जणांनी एका वृद्धास बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये. राजीव टेंबे (वय 64) असं या वृद्धाचे नाव असून मारहाणीत त्यांच्या हनुवटीला तीन टाके पडले आहे. तसंच त्यांच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.

रविवारी दुपारी बाराच्या सुमारास टेंबे त्यांच्या नातूसह वाकडमधल्या दत्त मंदिरात पाया पडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपली चप्पल मंदिराच्या पायरीवर काढली होती. पण ‘चप्पल मंदिरा बाहेर का काढली नाही?’ असं विचारत पुजारींसह 2 ते 3 तरुणांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत टेंबे यांना गंभीर दुखापत झाली.

मंदिर व्यवस्थापनाने मात्र मारहाणीच्या आरोपांचा इन्कार केला आहे. मंदिराबाहेर चप्पल काढण्याबाबत समज देत असताना झटापट झाल्याचा दावा मंदिराचे विश्वस्त करीत आहेत. किरकोळ कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला एवढी बेदम मारहाण करण्याच्या प्रकाराबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close