वीजबळीच्या वारसांना सरकारकडून 4 लाखांची मदत जाहीर

October 6, 2015 8:28 PM0 commentsViews:

Eknath khasse

06 सप्टेंबर : वीज कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल मदत आणि पुनवर्सनमंत्री एकनाथ खडसे यांनी माहिती दिली.

यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील 69 जणांचा वीज पडून मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांतील वादळी पावसाने 40 वीजबळी घेतले होते. आतापर्यंतच्या शासकीय धोरणानुसार वीजबळीच्या नातेवाईकांना एक लाखांची मदत देण्यात येत होती. मात्र, आता ही मर्यादा वाढवून आता चार लाखांपर्यंत करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शवविच्छेदन अहवाल आल्यावर 24 तासांच्या आत ही मदत देण्याचे आदेशही एकनाथ खडसेंनी दिला आहे.

याशिवाय वीज पडून शेतकर्‍यांची जनावरंही दगावली आहेत. त्याबाबतही सरकारने मदत जाहीर केली आहे. बैलांसारख्या मोठ्या जनावरांसाठी 30 हजार रुपये, गाढव-ऊंट 15 हजार आणि शेळ्या-मेंढ्यांसाठी साडेतीन हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close