भिवंडी पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे विजयी

January 23, 2010 8:42 AM0 commentsViews: 10

23 जानेवारी भिवंडी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांचा 1676 मतांनी विजय झाला आहे. अतिशय चुरशीच्या लढाईत म्हात्रे यांनी शेवटच्या दोन फेर्‍यांमध्ये आघाडी घेत विजय मिळवला. समाजवादी पक्षाचे उमेदवार फरहान आझमी आणि रुपेश म्हात्रे यांच्यांत मतमोजणीच्या अखेरपर्यंत पारडं दोन्ही बाजूंनी झुकत होतं. भिवंडी मतदारसंघाचा इतिहास पाहता शेवटी सपाच बाजी मारणार असंही वातावरण होतं. मात्र शेवटच्या 2 फेर्‍यांमध्ये रुपेश म्हात्रेंच्या मतात झपाट्याने वाढ झाली. आणि आझमींचा लिड तोडत, रुपेश म्हात्रे यांचा 1676 मतांनी विजयी झाला. अबू आझमी हे दोन ठिकाणांहून निवडून आल्याने त्यांनी भिवंडीच्या आमदारपदाचा राजीनामा दिला होता. 20 जानेवारीला या ठिकाणी निवडणूक झाली होती. शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस असल्याने शिवसैनिकांनी भिवंडीत म्हात्रेंच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांना तिसर्‍या क्रमांकाची मत मिळाली.निकालानंतर आझमींचा कांगावा भिवंडीत शिवसेनेने विजय मिळाल्यानंतर समाजवादी पक्षाच्या पराभव काँग्रेसमुळेच झाल्याचा आरोप अबू आझमी यांनी केला आहे. तसेचं शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर बोगस वोटींग केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या क्षेत्रात मला फिरायलाही आयोगाने बंदी घातली होती, त्यामुळे मी फिरु शकलो नाही, असं पराभवाचं कारण देत आझमींनी काँग्रेस आणि शिवसेनेचे मोठे नेते मात्र प्रचार करत होते असा तक्रारीचा सूरही लावला आहे.

close