लवासाला दणका, 200 एकर जमीन परत करण्याचे आदेश

October 6, 2015 10:28 PM0 commentsViews:

fasdasdas

06 ऑक्टोबर : लवासाला पुण्याच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी जोरदार दणका दिला आहे. लवासातील 200 एकर जमीन शेतकर्‍यांना परत करा, असे आदेश पुणे उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी दिले आहेत.

लवासा प्रकल्प सुरू करताना बेकायदेशीरपणे तिथल्या स्थानिकांची जमीन लाटल्याचा आरोप होत होता. त्या पार्श्वभूमीवर काही शेतकर्‍यांना दंडाधिकार्‍यांकडे धाव घेतली. याप्रकरणात सुनावणी करताना लवासातील 13 शेतकर्‍यांची जमीन बेकायदेशीर पद्धतीनं घेतलेली 200 एकर जमीन परत करा, असे आदेश पुणे उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी दिले आहेत.

ही जमीन आदिवासी कुटुंबांची असून बेकायदेशीरपणे लवासा कंपनीच्या नावी करण्यात आली होती. आता ही जमीन सरकारजमा करण्यात येईल आणि त्यानंतर आदिवासी कुटुंबांना परत करण्यात येईल.

मेधा पाटकर यांच्या राष्ट्रीय जनआंदोलनाचा समन्वय या संघटनेने आदिवांसींच्या जमिनी परत मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता, त्यांचा हा विजय मानला जातो आहे. तर, लवासाचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला असून लवासाची पाठराखण करणार्‍या शरद पवारांना हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रीया सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close