मी,आत्महत्येचा प्रयत्न केला नाही – इंद्राणींचा जबाब

October 7, 2015 8:40 AM0 commentsViews:

indrani mukharjee_sheena bora07 ऑक्टोबर : मी, कोणत्याही गोळ्या घेतल्या नव्हत्या, असा खुलासा शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिनं केलाय. मी आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचंही तीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय. आईच्या निधनामुळे मानसिक धक्का बसला होता असंही तीने म्हटलंय.

शीना बोरा हत्येप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे तिची प्रकृती खालावली होती. कस्टडीमध्ये असताना इंद्राणीने इतक्या गोळ्या सेवन केल्याचं कशा ?, इंद्राणीने आत्महत्येचा प्रयत्न केला का ?, अशी प्रश्न उपस्थिती झाली होती. अखेर खुद्द इंद्राणींने आपला जबाब नोंदवत प्रकरणावर पडदा टाकलाय. आपण आत्महत्येचा प्रयत्न केला नाही आणि अतिरिक्त गोळ्या सेवनही केलं नाही असं तीने जबाबात म्हटलंय. तसंच आपल्याला वयाच्या 13व्या वर्षी अशाच प्रकारचा त्रास झाला होता. असंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे. 3 तास चाललेल्या जबाबात तीनं हा खुलासा केला. आईच्या निधनाची बातमी कळल्यावर आपण मानसिकरित्या अस्वस्थ होतो. आणि जेवण करणं बंद केलं होतं असंही तीनं सांगितलं. दरम्यान इंद्राणी मुखर्जीची मानसिक आणि शारिरीकदृष्ट्‌या प्रकृती उत्तम असल्यानं तिला जे.जे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. त्यामुळे इंद्राणीची परत भायखळा तुरुंगात रवानगी करण्यात आली.

इंद्राणीचा जबाब
“मी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. मी कोणत्याही गोळ्या साठवल्या नाहीत. मला भेटायला येणार्‍यांनी मला काहीही दिलं नाही. माझ्या आईचं निधन झाल्याचं कळल्यावर मी खूप अस्वस्थ होते.”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close