शेतकरी आणि ग्राहकांचं हित साधण्याचा प्रयत्न करणार – शरद पवार

January 23, 2010 8:47 AM0 commentsViews:

23 जानेवारीमहागाईला मी किंवा कृषी खातं जबाबदार नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ठामपणे सांगितलं आहे. महागाईच्या मुद्द्यावरून शरद पवार सध्या सर्वांच्या टीकेचं लक्ष्य बनले आहेत. IBN लोकमतशी खास बातचीत करताना पवारांनी आपला भर शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांमधे समन्वय साधण्यावरच असेल, हे स्पष्ट केलं आहे. साखरेची टंचाई, दूध उत्पादन या संदर्भात सरकारी धोरणांवर बोलतानाच, पवारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. माझ्या राजीनाम्याने जर पाऊस पडणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार असल्यांचं सांगितलं. देशात वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई जाणवण्याचा प्रश्नच नसल्याचंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

close