फोनवरुन बोललं म्हणून कुणी खून करतं का?, गृहमंत्र्यांकडून पाठराखण

October 7, 2015 11:11 AM0 commentsViews:

07 ऑक्टोबर : “कुणी फोनवर धमकी दिली म्हणून त्याने खून केला असं होत नाही. आपणही फोनवर बघून घेतो तुला असं सहज म्हणतो. पण, काय खून कधी करतो” असंच समीर गायकवाडच्या बाबतीत झालंय असा अजब तर्क लढवत राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी समीर गायकवाडची पाठराखण केली. एकाप्रकारे पाटील यांनी सनातन संस्थेला क्लीन चिटच देऊन टाकलीये.ranjeet patil

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलं. समीरने आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलतांना मीच पानसरेंना संपवलं अशी कबुली दिली होती असं पोलीस तपासात उघड झालं. पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा हात असल्याचं समोर आल्यामुळे सनातनवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. पण, राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत समीरचीच बाजू मांडलीये.

कुणी फोनवर धमकी दिली म्हणून त्याने खून केला असं होत नाही. आपणही फोनवर बघुन घेतो तुला असं सहज म्हणतो. पण, काय खून थोडी करतो असा तर्कच लढवलाय. तसंच एखाद्या संशयित आरोपीच्या अटकेवरून सनातनवर बंदी घातला येणार नाही, अशी वादग्रस्त प्रतिक्रियाही गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली आहे.

एकाप्रकारे समीरची बाजून घेतल गृहराज्यमंत्र्यांनी सनातनची पाठराखण केलीये. पण या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close