विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे दिले दुष्काळग्रस्तांना !

October 7, 2015 11:39 AM0 commentsViews:

studnet help407 ऑक्टोबर : दुष्काळानं बळीराजा होरपळत असतांना त्याच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहे. असाच एक खारीचा वाटा विद्यार्थ्यांनी उचललाय. विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे दुष्काळ निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले आहे. ही रक्कम 25 हजार इतकी आहे.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येत निधी गोळा केला आणि दुष्काळग्रस्तांना पाठवला. अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनीही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

आता मुलुंडच्या लक्ष्मीबाई इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळी भागातल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्याला मिळणारे खाऊचे पैसे खर्च न करता ते पैसे या विद्यार्थ्यांनी जमवले. ही रक्कम 25 हजार रुपये इतकी जमली. ती रक्कम विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत शाब्बासकी दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close