बारमालकांची अशी कशी मदत?, बिलामध्ये 5 टक्के दुष्काळनिधी वसूल !

October 7, 2015 11:55 AM0 commentsViews:

nagar bar news307 ऑक्टोबर : दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्र धावून आलाय. कुठे विद्यार्थी मदत करत आहे तर कुठे गणेश मंडळं मदत करत आहे. पण, अहमदनगरमध्ये बारवाल्यांनी दुष्काळनिधीच्या नावाखाली 5 टक्के वसुलीच सुरू केली आहे. बारचालकांनी ग्राहकांच्या बिलामध्ये दुष्काळ निधी असा स्पष्ट उल्लेख करत 5 टक्के कर जोडला आहे.

दुष्काळाचं राजकारण केलं जातं, म्हणून राजकारण्यांना नावं ठेवली जातात. पण, फक्त राजकारणीच नाही तर दुष्काळात इतरही अनेकजण हात धुऊन घेतायेत. यामध्ये बारवालेही मागे नसल्याचं समोर आलंय. दुष्काळ निधीच्या नावाखाली अहमदनगरमध्ये बारवाले चक्क पाच टक्के रक्कम आकारत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.

बारवाले मात्र, आपण सरकारी नियमानुसार पाच टक्के निधी घेत असल्याचं सांगताय. बातम्यांनुसार निर्णय घेतल्याचा अजब खुलासा त्यांनी केलाय. सरकारचा निर्णय न झाल्यास हा निधी आम्ही नाम संस्थेला देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. प्रशासनानं मात्र अजून असा काहीच निर्णय झाला नसल्याचं सांगितलंय. त्यामुळं ग्राहकांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close