अंडर 19 वर्ल्डकप : पाकिस्तानकडून भारत पराभूत

January 23, 2010 11:35 AM0 commentsViews: 1

23 जानेवारीअंडर 19 वर्ल्डकपमध्ये गतविजेत्या भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानने 2 विकेटने पराभव केला. टॉस जिंकून पाकिस्तानने भारताला पहिली बॅटींग दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये फयाज बटनं दोन्ही ओपनर्सच्या विकेट घेतल्या. मनदीप आणि हरप्रीत सिंगनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही केवळ 40 रन्सची पार्टनरशिप करता आली. मनदीपनं शेवटपर्यंत लढत दिली. आणि इनिंगमध्ये सर्वाधिक 40 रन्स केले. शेवटी झालेल्या फटकेबाजीमुळे भारताला 114 रन्सचा टप्पा गाठता आला. याला उत्तर देताना पाकिस्तानचीही 16 रन्सवर 3 विकेट अशी त्यांची परिस्थिती होती. पण अहसान अली आणि रमीझ अझिझने केलेल्या पार्टनरशिपमुळे पाकिस्तानला विजय शक्य झाला. त्यात भारताच्या ढिसाळ फिल्डींगचाही पाकिस्तानला फायदा झाला. हमद अझमने शेवटचा फोर मारत आपल्या टीमचा सेमी फायनलचा प्रवेश नक्की केला. पावसामुळे मॅच उशीरा सुरू झाली. आणि मॅच प्रत्येकी 23 ओव्हर्सची करण्यात आली.

close