पंतप्रधानांना सैतान म्हणणार्‍या ओवेसींना अटक करण्याचे आदेश

October 7, 2015 2:55 PM0 commentsViews:

owasi4307 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सैतान अशी टीका करणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये किशनगंजमध्ये ओवेसींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

अकबरुद्दीन ओवेसींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच धार्मिक भावना भडकावण्याचा आरोपही करण्यात आलाय. किशनगंज एसपी राजीव रंजन यांनी ओवेसींच्या अटकेचे आदेश दिले आहे.

एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसींचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवेसींनी रविवारी बिहारमध्ये किशनगंजमध्ये रॅली घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाषण केलं होतं. ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शैतान अशी टीका केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close